Onlineblogs

किती विचित्रच असतं ना सगळं….

आयुष्याच्या पलिकडचं, प्रत्येक गोष्टींवर विचार करायला लावणारं… पण आयुष्य हे सोपं नसतं हे मात्र कळलं।

जीवन जगत असताना अनेक अडचणी येत असतात…

फक्त गरज असते ती म्हणजे त्यांना सामोरे जाण्याची, न हारता, न थकता, न थांबता…

प्रत्येक प्रश्नाचं उत्तर नक्कीच असतं…

आणि उत्तर हे नेहमी प्रश्नातच असतं… गरज असते ती फक्त शोधण्याची… आणि त्यासाठी तश्या प्रकारचा दृष्टिकोण आणि इच्छाशक्ती असावी लागते…

मग बघा आयुष्य किती सोप्पं आहेत…

आणि खरंच आयुष्य सोप्पं च आहे, माणसानेच त्याला अवघड बनवलंय…

माणसाच्या नकारात्मक विचारांनी, बधीर पडलेल्या इच्छाशक्तीने आणि थकलेल्या सामर्थ्याने…

कधी कधी असं होतंय… खूप साऱ्या अडचणी एकाचवेळेस येतात. तेव्हा सगळे विचार स्तब्द्ध होतात… शरीर, मन, आणि बुद्धी क्रिया करणंच बंद करतात… कारण परिस्थिती अगदी विचारांच्या पलिकडची असते, विपरीत असते…

आणि शेवटी सगळं विचारशुन्य झालं…

की शेवटी एकच विचार येतो आयुष्याचा शेवट करण्याचा… बस्स…

पण आयुष्य संपवणे हे शेवटचा पर्याय नहिच….

माणूस कामाने नाही, तर अति विचाराने थकतो, तो विचार म्हणजे नकारात्मक विचार…

अशा परिस्थितीला तोंड कसं द्यायचं…

अडचणींचा सामना कसा करायला पाहिजे याचा कधी विचारच करत नाही…

असं कोणतंच कोडं नाही…

कि जे सोडवता येत नाही, अशी कोणतीच गोष्ट नाही, कि जी साध्य करता येत नाही, अशी कोणतीच परिस्थिती नाही, कि ज्यावर उपाय नाही…

आणि असं कोणतच संकट नाही…

कि ज्यावर मात करता येत नाही…

फक्त गरज असते ती म्हणजे…

दृढनिश्चय, इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि सकारात्मक दृष्टीकोण…

अडचणी प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात, पण सहनशक्ति प्रत्येकांमध्येच असते…

माणूस कधी विचारंच करत नाही…

अडचणीतून मार्ग काढण्याचा… आणि अश्या वेळेस फक्त मनाची शांतता हवी…

आवश्यकता असते ती स्वतःच्या विचारांमध्ये एकदा तरी डोकावून पाहणे…

Man jumping over impossible or possible over cliff on sunset background,Business concept idea

मला योग्य वाटते, फक्त गरज असते ती स्वतःला ओळखण्याची आणि समजण्याची…

संकट किव्वा अडचणी हे अगदी लहानच असतात…

त्याला बळकट बनवतेय, तो म्हणजे आपले नकारात्मक विचार. कोणतेहि संकट आपल्यात तेव्हांच भीती निर्माण करते, जेव्हा स्वतःचा विश्वास स्वतःवर नसतो…

प्रत्येकच गोष्टीला मार्ग असतो…

गरज असते ती फक्त शोधण्याची. एकांतात रडत बसून, सतत भूतकाळ, भविष्य आणि वर्तमान काळाची चिंता करून स्वतः ला दुबळं बनविण्या पेक्षा सकारात्मक विचारांनी मजबूत बनाव असं मला वाटते…

आणि कोणतीच गोष्ट हि असाध्य नसते…

आयुष्यात येणाऱ्या अडचणींपेक्षा महत्वाचं असतं ते जीवन, विचार महत्वाचे असतात, दृष्टिकोण महत्वाचा असतो, शेवटी सांगायचं असं की माणूस महत्वाचा असतो. आणि हे ज्यावेळेस माणसाला कळले त्यावेळेस कुठलीच परिस्थिती हि भयावह वाटणार नाही… आपल्यात काय आहे आणि आपण काय करू शकतो हे जेव्हा कळेल तेव्हा खऱ्या अर्थाने माणसाला स्वतःची जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही…

**संकट नावाच्या शत्रू वर साकारात्मक विचार आणि अथक प्रत्यनाचंच शस्त्र चालवावं लागतं हे जो पर्यंत माणसाला कळत नाही तोपर्यंत अश्या येणाऱ्या अनेक परिस्थिती मध्ये माणूस थकलेला आणि हारलेलाच दिसणार…

परिस्थिती बदलण्याचं सामर्थ्य माणसातच आहे…

परंतू कधी कधी हे साध्य करता येत नसलं तर मग काय त्यात ओघळून जायचं का…? नाही… परिस्थिती जर बदलत नसेल तर मनस्थिती बदलावी लागते तेव्हाच कोणतीहि गोष्ट साधता येते.

विद्येचे शिल्पकार सद्गुरू श्री. वामनराव पै खूप सुंदर म्हटलेलं वाक्य म्हणजे…

तूच आहे तुझ्या जिवनाचा शिल्पकार..

अगदी खरयं…

फक्त आवश्यकता आहे ती म्हणजे स्वतःला ओळखण्याची, हसून कोणत्याहि परिस्थितीचा सामना करण्याची… आणि मग बघा आयुष्य किती सोप्पं आणि सुंदर.